Ad will apear here
Next
दैव कथासंग्रहाचे प्रकाशन

दैव कथासंग्रह प्रकाशन
मंगळवेढा (सोलापूर) : धनंजय शंकर पाटील लिखित आणि सोलापूरच्या ‘थिंक टँक पब्लिकेशन्स’तर्फे प्रकाशित ‘दैव’ या कथासंग्रहाचे, तसेच ‘पसायदान’ (जून २०१७) या ई-मासिकाचे प्रकाशन सोलापूर येथील प्रसिद्ध लेखिका आशा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेने मंगळवेढा येथील दामाजीनगर शाखेच्या वतीने, ज्ञानदीप विद्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

या वेळी विश्वनाथ ढेपे, कथालेखक राजेंद्र भोसले, प्रा. दत्ता सरगर, आशा पाटील, धनंजय शंकर पाटील यांनी ‘दैव’ कथासंग्रहाविषयीचे आपले विचार व्यक्त केले. समारंभाचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अश्फाक काझी यांनी प्रास्ताविक, तर बालाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन कवी गोरक्ष जाधव यांनी केले. 

या वेळी मंचावर अॅड. तोडकर, रत्नप्रभा पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शंकर पाटील, अॅड. नंदकुमार पवार, अॅड. रमेश जोशी, अंकुश गाजरे, कवी विजयकुमार देशपांडे, कवी गणेश गायकवाड, विठोबा सरगर, सुनील बिराजदार, प्रा. विश्वनाथ ढेपे, प्रा. दत्ता सरगर, कवी गोरक्ष जाधव, संगीता मासाळ यांच्यासह बहुसंख्य साहित्यरसिक उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CYVHBD
Similar Posts
‘प्रगती खांडेकर म्हणजे मंगळवेढेकरांचा अभिमान’ मंगळवेढा (सोलापूर) : ‘तालुक्यातील डोणज येथील प्रगती आमसिद्ध खांडेकर हिने कोलंबो (श्रीलंका) येथे स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेत तीन हजार मीटर धावणे या प्रकारात गोल्ड मेडल मिळवून मंगळवेढेकरांची मान उंचावली आहे. प्रगती म्हणजे मंगळवेढेकरांचा अभिमान आहे,’ असे मत ‘युटोपियन शुगर्स’चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी व्यक्त केले
आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम मंगळवेढा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स तर्फे खाते अंतर्गत क्रिकेट आणि आट्यापाट्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इंजिनिरिंग विभागाने क्रिकेट व आत्यापट्या या दोन्ही सामन्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले.         
पाटखळच्या कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये जागतिक योगदिन उत्साहात साजरा मंगळवेढा (सोलापूर) : मौजे पाटखळ (ता. मंगळवेढा) येथे युटोपियन शुगर्स कारखान्याच्या परिसरात नव्यानेच सुरुवात करण्यात आलेल्या पांडुरंग प्रतिष्ठान, पंढरपूर संचालित ‘कर्मयोगी विद्यानिकेतन’ येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
‘युटोपियन शुगर्स म्हणजे प्रयोगशील कारखाना’ कुरुल (सोलापूर) : ‘नावीन्याचा शोध घेऊन आपल्या ऊस उत्पादकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी सातत्याने नवनवीन योजनांची अंमलबजावणी करीत असलेला हा ‘युटोपियन शुगर्स’ हा प्रयोगशील कारखाना आहे. या कारखान्याच्या ऊस उत्पादकांमध्ये फार थोड्या दिवसांत मोठा बदल दिसणार असून, १०० टन प्रति एकर ऊस उत्पादनाचे तंत्रज्ञान

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language